TY - BOOK AU - Pawar, Deepa. TI - पोलादी बाया/ Poladi baya: राबून निर्मिती घडवणाऱ्या/ Rabun nirmiti ghadvnarya SN - 9788196336950 U1 - 305.420941 PY - 2023/// CY - Pune PB - Hariti publications KW - Women's rights KW - Women's struggle KW - Women and socialism KW - Women--Social conditions KW - Women N1 - मनोगत १. अंजना २. भिकूबाई ३. छायाबाई ४. खैरून ५. सीताताई ६. अरुणा ७. मीराबाई ८. शांताबाई N2 - पोटापाण्याची खळगी भरणे ह। भटक्या जमातींच्या दृष्टीने जीवघेणा प्रवास असतो. पालात दिसणारे त्यांचे छोटे उद्योग असेच सुरू होत नसतात. नियोजन, भांडवल, धोका, बांधणी, निर्माण अशी अनेकविध टप्प्यांनी नटलेली प्रक्रिया त्यांनाही पूर्ण करावीच लागते. त्यात कंबर कसून उतरणाऱ्या बाया रक्ताचं पाणी करून तापलेल्या भट्टीसमोर पोलादी अवजारांची घडवणूक करत असतात. सतत भटकंती करत उदरनिर्वाह करणाऱ्या भटक्या-विमुक्तांना त्यांच्या फिरस्ती मार्गाचा गाढा अभ्यास असतो. गावांचे नकाशे त्यांनी बुद्धिमत्तेत साठवलेले असतात. सणवार, जत्रा, यात्रा या सर्वांचा सखोल लेखाजोखा त्यांच्या स्मरणात असतो. कुठे पैशांची शाश्वती मिळेल, कुठे सुरक्षित वातावरण मिळेल अशा बऱ्याच प्रश्नांची जणू चेक लिस्टच त्यांच्याकडे असते आणि बेशक या एकूणच नियोजनामागे राबणाऱ्या या पोलादी बायांची जैविक बुद्धिजीवी वृत्तीच महत्त्वाची असते. जेव्हा त्यांना कोणाचीच सोबत नसते, आधार नसतो तेव्हा जगण्याच्या हक्कांची जाण त्यांना असीम ऊर्जा देत असते. लोहार कामाची कला या पोलादी बायांच्या जगण्याचे सामर्थ्य आहे. जणू त्यातूनच स्वतःच्या प्रकाशमय वाटा शोधत त्या नवनिर्माणाचे अंकुर फुलवत आहेत ER -