कहाणी माहिती अधिकाराची : लोकांच्या दिशेने झालेला सत्तेचा प्रवास/ Kahani mahiti adhikarachi : lokanchya dishene jhalela sattecha pravas 'द आरटीआय स्टोरी' चा मराठी अनुवाद/ The RTI story cha marathi anuvad

By: Roy, ArunaContributor(s): Dongare, Avdhut [Translator]Material type: TextTextPublication details: Pune Sadhana Prakashan 2020Edition: 1st edDescription: 406pISBN: 978-9386273659Subject(s): Social justice | Social movements | India--Rajasthan | India | RTI storyDDC classification: 323.4450 Summary: कोंडून पडलेली भयग्रस्त राज्यव्यवस्था, गुदमरलेलं प्रजासत्ताक आणि कुपोषित लोकशाही या सगळ्याला मदतीचा हात कसा मिळाला, याची कहाणी या पुस्तकातून आपल्यासमोर उलगडत जाते. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, 'घटनात्मक नैतिकता' वाचवण्यासाठी सरसावलेला हा मदतीचा हात आहे. अनन्यसाधारण प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व असलेल्या अरुणा रॉय आणि त्यांचे सहकारी निखिल डे, शंकर सिंग, त्यांची पत्नी अंशी व त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या इतर मंडळींनी मिळून १९९० मध्ये राजस्थानातील दुर्गम खडकाळ भागात 'मजदूर किसान शक्ती संघटन' या संस्थेची स्थापना कशी व का केली इथपासून प्रस्तुत पुस्तकाचं 'कथानक' सुरू होतं. अनेक बेधडक अभियानं चालवून, निग्रहाने प्रतिकार करून, अटीतटीच्या वाटाघाटींना तोंड देऊन, कठोर निर्णय घेऊन, प्रसंगी हलाखी व छळ सहन करून या संघटनेने असाधारण धोक्यांचा सामना केला. अजाणपणाचा अंधार दूर करणं, कायदे व हक्क यांच्याविषयीची समजूत वाढवणं, दिवसाढवळ्या झोपा काढणाऱ्या प्रशासकांना जागं करण्यासाठी आवश्यक असलेला निर्धार व निधडेपणा दृढ करणं, या उद्देशाने हे प्रयत्न करण्यात आले. ही कहाणी अनपेक्षितरीत्या मिळालेल्या समर्थनाचीसुद्धा आहे. 'हल्ल्याचं लक्ष्य' असलेल्या नोकरशाहीमधल्याच काही जागरूक घटकांकडून या चळवळीला अनेकदा समर्थन मिळालं; शिवाय बुद्धिजीवी, लेखक, इतर बिगरसरकारी संस्था आणि दुर्गम ठिकाणच्या प्रबुद्ध भारतीय लोकमताकडूनही समर्थन मिळालं.
    Average rating: 0.0 (0 votes)
Item type Current library Call number Materials specified Status Date due Barcode
Books Marathi Books Marathi YUVA Library
323.4450/ROY(M) (Browse shelf (Opens below)) Available BK00911

कोंडून पडलेली भयग्रस्त राज्यव्यवस्था, गुदमरलेलं प्रजासत्ताक आणि कुपोषित लोकशाही या सगळ्याला मदतीचा हात कसा मिळाला, याची कहाणी या पुस्तकातून आपल्यासमोर उलगडत जाते. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, 'घटनात्मक नैतिकता' वाचवण्यासाठी सरसावलेला हा मदतीचा हात आहे. अनन्यसाधारण प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व असलेल्या अरुणा रॉय आणि त्यांचे सहकारी निखिल डे, शंकर सिंग, त्यांची पत्नी अंशी व त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या इतर मंडळींनी मिळून १९९० मध्ये राजस्थानातील दुर्गम खडकाळ भागात 'मजदूर किसान शक्ती संघटन' या संस्थेची स्थापना कशी व का केली इथपासून प्रस्तुत पुस्तकाचं 'कथानक' सुरू होतं.

अनेक बेधडक अभियानं चालवून, निग्रहाने प्रतिकार करून, अटीतटीच्या वाटाघाटींना तोंड देऊन, कठोर निर्णय घेऊन, प्रसंगी हलाखी व छळ सहन करून या संघटनेने असाधारण धोक्यांचा सामना केला. अजाणपणाचा अंधार दूर करणं, कायदे व हक्क यांच्याविषयीची समजूत वाढवणं, दिवसाढवळ्या झोपा काढणाऱ्या प्रशासकांना जागं करण्यासाठी आवश्यक असलेला निर्धार व निधडेपणा दृढ करणं, या उद्देशाने हे प्रयत्न करण्यात आले. ही कहाणी अनपेक्षितरीत्या मिळालेल्या समर्थनाचीसुद्धा आहे. 'हल्ल्याचं लक्ष्य' असलेल्या नोकरशाहीमधल्याच काही जागरूक घटकांकडून या चळवळीला अनेकदा समर्थन मिळालं; शिवाय बुद्धिजीवी, लेखक, इतर बिगरसरकारी संस्था आणि दुर्गम ठिकाणच्या प्रबुद्ध भारतीय लोकमताकडूनही समर्थन मिळालं.

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by Mr. Wasim Rahaman for KMLC

Powered by Koha