बळीवंश/Balivansh

By: Salunkhe, A. HMaterial type: TextTextPublication details: Satara Lokayat 2022Edition: 2nd edDescription: 448pISBN: 9789384091934Subject(s): Indian culture | History of cultureDDC classification: 306 Summary: जीवघेण्या संघर्षांतही त्यांची हृदये स्वच्छ आणि मस्तके ताठ राहिली बळीवंशातील राजांना सत्ता नको होती, असे नाही. परंतु आपली सत्ता विशिष्ट तत्त्वज्ञानावर, नीतिमूल्यांवर, जीवनदर्शनावर उभी असली पाहिजे, याची पुरेपूर काळजी ते घेत होते. त्यांनी आपल्या हाताने आपल्या स्वातंत्र्याच्या आकांक्षा विसर्जित केल्या असत्या आणि आक्रमक आर्य आपल्यापेक्षा वरचढ होत आहेत म्हटल्यावर त्यांच्यापुढे शरणागती पत्करली असती, तर त्यांच्या इतक्या पिढ्यांना आपले प्राण गमवावे लागले नसते. त्यांनी स्वतःच वैदिकांच्या रंगात रंगून जायचे ठरविले असते, तर आयाँचे मांडलिक म्हणून ते सुखेनैव जगू शकले असते आणि त्यांनी टाकलेल्या सत्तेच्या छोट्यामोठ्या तुकड्यांवर पोट भरण्यासाठी लाळ घोटत सुखी राहू शकले असते. परंतु त्यांच्यापैकी कोणीही आत्मद्रोहाचा हा मार्ग पत्करला नाही. त्यांच्या सैन्यातील वा प्रजेतील काही व्यक्तींनी वा गटांनी गद्दारीचा मार्ग स्वीकारला, हे खरे आहे. परंतु हिरण्याक्षापासून बाणापर्यंत कोणीही आपल्या जीवनमूल्यापेक्षा आपल्या प्राणांना अधिक महत्त्व दिले नाही, मग त्यांच्याकडून जीवनमूल्यांपेक्षा सत्तेला अधिक महत्त्व दिले जाण्याची शक्यता तर फार दूरची झाली. अगदी जीवघेण्या संघर्षांतही त्यांची हृदये स्वच्छ आणि मस्तके ताठ राहिली. त्यांच्या पद्धतीने जगणे हे तर खरे जगणे आहेच, पण त्यांच्या पद्धतीने मरणे हे देखील जीवनाचा झेंडा उंच उंच फडकविण्यासारखे आहे. हजारो वर्षे ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे, असा जिवलग आणि आमचा लाडका बळीराजा ? तो तर तत्त्वदर्शिनी बुद्धी असलेला बुद्ध. प्रजेतील प्रत्येकाला त्याच्या श्रमाचा योग्य हिस्सा विभागून देणारा संविभागी. स्वतः सर्वांशी समतेने वागणारा आणि प्रजेतील सर्वांना परस्परांशी समतेने वागण्याची प्रेरणा देणारा समतावादी. यज्ञयागांच्या भ्रामक कर्मकांडाऐवजी निर्मितिगर्भ कृषीला जपणारा बळीराजा. वैदिकांची शोषक व्यवस्था नाकारताना एक भावात्मक, सकारात्मक, क्रियाशील समाजरचना घडवून आणणारा समाजशिल्पकार, कारस्थानांना आणि कपटांना निर्मळ निरागस मनाने सामोरा जाणारा उन्नत महामानव. काही व्यक्ती व समूह यांचा अपवाद वगळता इतरांनी आपल्या हृदयासनावर प्रेममंत्राने अभिषिक्त केलेला आणि सम्यक राज्यकर्ता असलेला सम्-राज सम्राट. पराभवातही पराभूत न होणारा शांतचित्त तत्त्ववेत्ता. हजारो वर्षे ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे, असा जिवलग. इतका जिवलग, इतका जिवलग की सात काळजांच्या आत कायमचा जपून ठेवावा इतका जिवलग !
    Average rating: 0.0 (0 votes)
Item type Current library Call number Materials specified Status Date due Barcode
Books Marathi Books Marathi YUVA Library
306/SAL(M) (Browse shelf (Opens below)) Available BK04507

जीवघेण्या संघर्षांतही त्यांची हृदये स्वच्छ आणि मस्तके ताठ राहिली

बळीवंशातील राजांना सत्ता नको होती, असे नाही. परंतु आपली सत्ता विशिष्ट तत्त्वज्ञानावर, नीतिमूल्यांवर, जीवनदर्शनावर उभी असली पाहिजे, याची पुरेपूर काळजी ते घेत होते. त्यांनी आपल्या हाताने आपल्या स्वातंत्र्याच्या आकांक्षा विसर्जित केल्या असत्या आणि आक्रमक आर्य आपल्यापेक्षा वरचढ होत आहेत म्हटल्यावर त्यांच्यापुढे शरणागती पत्करली असती, तर त्यांच्या इतक्या पिढ्यांना आपले प्राण गमवावे लागले नसते. त्यांनी स्वतःच वैदिकांच्या रंगात रंगून जायचे ठरविले असते, तर आयाँचे मांडलिक म्हणून ते सुखेनैव जगू शकले असते आणि त्यांनी टाकलेल्या सत्तेच्या छोट्यामोठ्या तुकड्यांवर पोट भरण्यासाठी लाळ घोटत सुखी राहू शकले असते. परंतु त्यांच्यापैकी कोणीही आत्मद्रोहाचा हा मार्ग पत्करला नाही. त्यांच्या सैन्यातील वा प्रजेतील काही व्यक्तींनी वा गटांनी गद्दारीचा मार्ग स्वीकारला, हे खरे आहे. परंतु हिरण्याक्षापासून बाणापर्यंत कोणीही आपल्या जीवनमूल्यापेक्षा आपल्या प्राणांना अधिक महत्त्व दिले नाही, मग त्यांच्याकडून जीवनमूल्यांपेक्षा सत्तेला अधिक महत्त्व दिले जाण्याची शक्यता तर फार दूरची झाली. अगदी जीवघेण्या संघर्षांतही त्यांची हृदये स्वच्छ आणि मस्तके ताठ राहिली. त्यांच्या पद्धतीने जगणे हे तर खरे जगणे आहेच, पण त्यांच्या पद्धतीने मरणे हे देखील जीवनाचा झेंडा उंच उंच फडकविण्यासारखे आहे.

हजारो वर्षे ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे, असा जिवलग

आणि आमचा लाडका बळीराजा ? तो तर तत्त्वदर्शिनी बुद्धी असलेला बुद्ध. प्रजेतील प्रत्येकाला त्याच्या श्रमाचा योग्य हिस्सा विभागून देणारा संविभागी. स्वतः सर्वांशी समतेने वागणारा आणि प्रजेतील सर्वांना परस्परांशी समतेने वागण्याची प्रेरणा देणारा समतावादी. यज्ञयागांच्या भ्रामक कर्मकांडाऐवजी निर्मितिगर्भ कृषीला जपणारा बळीराजा. वैदिकांची शोषक व्यवस्था नाकारताना एक भावात्मक, सकारात्मक, क्रियाशील समाजरचना घडवून आणणारा समाजशिल्पकार, कारस्थानांना आणि कपटांना निर्मळ निरागस मनाने सामोरा जाणारा उन्नत महामानव. काही व्यक्ती व समूह यांचा अपवाद वगळता इतरांनी आपल्या हृदयासनावर प्रेममंत्राने अभिषिक्त केलेला आणि सम्यक राज्यकर्ता असलेला सम्-राज सम्राट. पराभवातही पराभूत न होणारा शांतचित्त तत्त्ववेत्ता. हजारो वर्षे ज्याच्या पुनरागमनाची प्रतीक्षा केली जात आहे, असा जिवलग. इतका जिवलग, इतका जिवलग की सात काळजांच्या आत कायमचा जपून ठेवावा इतका जिवलग !

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by Mr. Wasim Rahaman for KMLC

Powered by Koha