ना गुलाम ना उद्धाम/ Na Gulam na Uuddham

By: Salunkhe, A. HMaterial type: TextTextPublication details: Satara Lokayat 2006Edition: 1st edDescription: 184pISBN: 978-9384091668Subject(s): Women and literature | Women | ReligionDDC classification: 973 Summary: मनोगत आज, 'ना गुलाम, ना उद्दाम' हे काहीसे वेगळे पुस्तक वाचकांच्या हाती देऊ इच्छीत आहे. हे एकाच विषयावरील सलग पुस्तक नाही. माझे विविध प्रकारचे काही लेखन आणि काह। व्याख्याने यांचे संकलन, असे त्याचे स्वरूप आहे. एकप्रकारे ही 'विविधा' आहे. हे अशा प्रकारचे संकलन असले, तरी पुस्तकाच्या शीर्षकातून व्यक्त होणारा जीवनविषयक भूमिकेचा एकच धागा त्यामध्ये सर्वत्र आहे, असे मला वाटते. पुस्तकाच्या पहिल्या विभागात महाभारतातील स्त्रियांविषयीचे पाच लेख आहेत. वस्तुत.. 'महाभारतातील स्त्रिया - भाग ३' या पुस्तकात ते समाविष्ट करण्याचे मूळ नियोजन होते. परंतु ते लेख लिहून झाल्यानंतर बरीच वर्षे त्या पुस्तकासाठीचे बाकीचे लेख लिहायला वेळ मिळाला नाही आणि पुढेही तसा वेळ लौकर मिळण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे हे लेख अप्रकाशित राहण्याऐवजी वाचकांपुढे ठेवणे योग्य, या भावनेने त्यांचा या पुस्तकात समावेश केला आहे. या कथा लिहिताना महाभारताने स्त्रियांविषयी वापरलेली भाषा अनेकदा मयदिचे उल्लंघन करणारी आहे. महाभारताचे मूळ स्वरूप स्पष्ट व्हावे, म्हणून त्या भाषेतील मांडणी नाइलाजाने चर्चेला घ्यावी लागली आहे. दुस-या विभागात वेगवेगळ्या विषयांवरचे तीन लेख घेतले आहेत. त्यांपैकी दुसरा लेख मां तोंडी सांगितला आणि त्याचे शब्दांकन डॉ. कुमार अनिल यांनी केले. या शब्दांकनाबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. तिस-या विभागात माझी शिवधमांविषयीची चार व्याख्याने अंतर्भूत केली आहेत. त्यांपैकी सिंदखेड येथील व्याख्यान कालक्रमानुसार अखेरचे असले, तरी पुस्तकात ते सर्वांत आर्थर्धा घेतले आहे. तसे करण्यामागे एक कारण आहे. विचारसरणीच्या दृष्टीने पाहता माणूस हा सततचा प्रवासी असतो, नवे नवे अनुभव घेऊन तो सत्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. स्वाभाविकच, माझ्या चार व्याख्यानांपैकी अखेरचे व्याख्यान हे अनुभवाच्या पुढच्या टप्प्यावरचे असल्यामुळे तेच प्रामुख्याने आणि प्राथम्याने वाचकांच्या पुढे ठेवावे, असा विचार करून ते व्याख्यान अगोदर घेतले आहे. माझ्या भाषणांतून जेथे जेथे हिंदू धर्माची आणि शिवधर्माची तुलना केली आहे, तेथे तेथे मला हिंदू या शब्दाने वैदिक हिंदूधर्म अभिप्रेत आहे. बहुजनांचा अवैदिक प्रवाह हिंदू शब्दाने अभिप्रेत नाही, हे स्पष्ट करू इच्छितो. सध्या माझी प्रकृती फारशी चांगली नसल्यामुळे आणि 'सर्वोत्तम भूमिपुत्रः गौतम बुद्ध' हे पुस्तक लिहून पूर्ण करणे मला खू महत्त्वाचे वाटत असल्यामुळे शिवधमांविषयी लेखन करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद आत यवतमाळचे प्रा. अशोक राणा हे भूषवीत आहेत. माझ्या त्यांना अंतःकरणपूर्वक सदिच्छा आहेत. चौथ्या विभागात मी विविध साहित्यिकांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनांपैकी काह निवडक प्रस्तावना वा त्यांचे अंश समाविष्ट केले आहेत. प्रस्तावनांचा क्रम पुस्तकांच्या कालक्रमा नुसार नाही वा संबंधित साहित्यिकांच्या ज्येष्ठतेनुसारही नाही. तो त्या त्या पुस्तकात चर्चेत घेतलेल्या विषयाच्या वा महान व्यक्तीच्या कालक्रमानुसार ठेवण्याचा प्रयत्न केला आहे पाचव्या विभागात सोलापूर येथे झालेल्या आठव्या विद्रोही साहित्य संमेलनातील माझे अध्यक्षौर भाषण घेतले आहे. माझी जीवनविषयक एकूण भूमिका स्थूलमानाने या भाषणात आलेली आहे, अर मला वाटते आणि म्हणूनच ते या पुस्तकाच्या अखेरीस अंतभूत केले आहे.
    Average rating: 0.0 (0 votes)
Item type Current library Call number Materials specified Status Date due Barcode
Books Marathi Books Marathi YUVA Library
973/SAL(M) (Browse shelf (Opens below)) Available BK03861

१ विभाग १ - महाभारतातील स्त्रिया
१) विश्वामित्राची अनामिक आई आणि बहीण सत्यवती
२) सुदर्शना आणि ओघवती
३) अप्सरा पंचचूडा आणि स्त्रीस्वभावकथन
४) रुचि
५) स्त्रीरूप उत्तर दिशा
२ विभाग २ - लेख
१) छत्रपती शाहू : आमचा लोकसिद्ध ईश्वर
२) प्रतिक्रांती रोखायला हवी
३) सामाजिक न्याय आणि धार्मिक, सांस्कृतिक संदर्भ
३ विभाग ३ - शिवधर्मविषयक व्याख्याने
१) शिवधर्म-प्रकटन-दिनी केलेले अध्यक्षीय भाषण - सिंदखेड
२) पहिल्या शिवधर्म-परिषदेतील अध्यक्षीय भाषण - तुळजापूर
३) दुसऱ्या शिवधर्म-परिषदेतील अध्यक्षीय भाषण - अकोला
४) तिसऱ्या शिवधर्म-परिषदेतील अध्यक्षीय भाषण - चंद्रपूर
४ विभाग ४-विविध साहित्यिकांच्या ग्रंथांना लिहिलेल्या प्रस्तावना
साहित्यिक
ग्रंथ
१) स्मृतिशेष प्राचार्य नरहर कुरुंदकर मनुस्मृती : काही विचार
२) चंद्रशेखर शिखरे
३) प्राचार्य गजमल माळी
४) डॉ.द.ता. भोसले
५) डॉ. श्रीराम गुंदेकर
६) डॉ. अशोक चोपडे
७) वसुधा पवार
८) अनिल सिंगारे
९) अर्जुन परब
१०) मच्छिंद्र सकटे
प्रतिइतिहास
म. जोतीराव फुले आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर
जोती म्हणे
म. जोतिबा फुले : साहित्य आणि साहित्यमूल्ये
विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य राजर्षी शाहू छत्रपती : एक अभ्यास
इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर
संत गाडगेबाबांची कीर्तने
अण्णाभाऊ साठे - एक सत्यशोधक
११) स्मृतिशेष रा. ना. चव्हाण
जनजागरण
१२) लोकशाहीर पुंडलीक फरांदे
लोकगीते
१३) डॉ.जे.बी. शिंदे
नव्या युगाचे अभंग
५ आठव्या विद्रोही साहित्यसंमेलनाचे अध्यक्षीय भाषण (सोलापूर)
६ संदर्भसूची

मनोगत

आज, 'ना गुलाम, ना उद्दाम' हे काहीसे वेगळे पुस्तक वाचकांच्या हाती देऊ इच्छीत आहे. हे एकाच विषयावरील सलग पुस्तक नाही. माझे विविध प्रकारचे काही लेखन आणि काह। व्याख्याने यांचे संकलन, असे त्याचे स्वरूप आहे. एकप्रकारे ही 'विविधा' आहे. हे अशा प्रकारचे संकलन असले, तरी पुस्तकाच्या शीर्षकातून व्यक्त होणारा जीवनविषयक भूमिकेचा एकच धागा त्यामध्ये सर्वत्र आहे, असे मला वाटते.

पुस्तकाच्या पहिल्या विभागात महाभारतातील स्त्रियांविषयीचे पाच लेख आहेत. वस्तुत.. 'महाभारतातील स्त्रिया - भाग ३' या पुस्तकात ते समाविष्ट करण्याचे मूळ नियोजन होते. परंतु ते लेख लिहून झाल्यानंतर बरीच वर्षे त्या पुस्तकासाठीचे बाकीचे लेख लिहायला वेळ मिळाला नाही आणि पुढेही तसा वेळ लौकर मिळण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे हे लेख अप्रकाशित राहण्याऐवजी वाचकांपुढे ठेवणे योग्य, या भावनेने त्यांचा या पुस्तकात समावेश केला आहे. या कथा लिहिताना महाभारताने स्त्रियांविषयी वापरलेली भाषा अनेकदा मयदिचे उल्लंघन करणारी आहे. महाभारताचे मूळ स्वरूप स्पष्ट व्हावे, म्हणून त्या भाषेतील मांडणी नाइलाजाने चर्चेला घ्यावी लागली आहे.

दुस-या विभागात वेगवेगळ्या विषयांवरचे तीन लेख घेतले आहेत. त्यांपैकी दुसरा लेख मां तोंडी सांगितला आणि त्याचे शब्दांकन डॉ. कुमार अनिल यांनी केले. या शब्दांकनाबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.

तिस-या विभागात माझी शिवधमांविषयीची चार व्याख्याने अंतर्भूत केली आहेत. त्यांपैकी सिंदखेड येथील व्याख्यान कालक्रमानुसार अखेरचे असले, तरी पुस्तकात ते सर्वांत आर्थर्धा घेतले आहे. तसे करण्यामागे एक कारण आहे. विचारसरणीच्या दृष्टीने पाहता माणूस हा सततचा प्रवासी असतो, नवे नवे अनुभव घेऊन तो सत्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. स्वाभाविकच, माझ्या चार व्याख्यानांपैकी अखेरचे व्याख्यान हे अनुभवाच्या पुढच्या टप्प्यावरचे असल्यामुळे तेच प्रामुख्याने आणि प्राथम्याने वाचकांच्या पुढे ठेवावे, असा विचार करून ते व्याख्यान अगोदर घेतले आहे. माझ्या भाषणांतून जेथे जेथे हिंदू धर्माची आणि शिवधर्माची तुलना केली आहे, तेथे तेथे मला हिंदू या शब्दाने वैदिक हिंदूधर्म अभिप्रेत आहे. बहुजनांचा अवैदिक प्रवाह हिंदू शब्दाने अभिप्रेत नाही, हे स्पष्ट करू इच्छितो. सध्या माझी प्रकृती फारशी चांगली नसल्यामुळे आणि 'सर्वोत्तम भूमिपुत्रः गौतम बुद्ध' हे पुस्तक लिहून पूर्ण करणे मला खू महत्त्वाचे वाटत असल्यामुळे शिवधमांविषयी लेखन करणाऱ्या समितीचे अध्यक्षपद आत यवतमाळचे प्रा. अशोक राणा हे भूषवीत आहेत. माझ्या त्यांना अंतःकरणपूर्वक सदिच्छा आहेत.

चौथ्या विभागात मी विविध साहित्यिकांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावनांपैकी काह निवडक प्रस्तावना वा त्यांचे अंश समाविष्ट केले आहेत. प्रस्तावनांचा क्रम पुस्तकांच्या कालक्रमा नुसार नाही वा संबंधित साहित्यिकांच्या ज्येष्ठतेनुसारही नाही. तो त्या त्या पुस्तकात चर्चेत घेतलेल्या विषयाच्या वा महान व्यक्तीच्या कालक्रमानुसार ठेवण्याचा प्रयत्न केला आहे

पाचव्या विभागात सोलापूर येथे झालेल्या आठव्या विद्रोही साहित्य संमेलनातील माझे अध्यक्षौर भाषण घेतले आहे. माझी जीवनविषयक एकूण भूमिका स्थूलमानाने या भाषणात आलेली आहे, अर मला वाटते आणि म्हणूनच ते या पुस्तकाच्या अखेरीस अंतभूत केले आहे.

Marathi

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by Mr. Wasim Rahaman for KMLC

Powered by Koha