जेव्हा माणूस माग काढतो/ Jevha manus mag kadhto अनौपचारिक शिक्षण व जाणीव जागृतीचे प्रशिक्षण/anaupcharik shikshan v janiv jagrutiche prashikshan - Maharashtra TRESS team . - 231p.

'ट्रेस' च्या पहिल्या आवृत्तीचे देशभर चांगलेच स्वागत झाले. गुणग्राहक व सुचना करणारी अनेक पत्रे आली. जसजसे नवीन नवीन व्यक्तींना 'ट्रेस' विषयो समजत गेले तसतशी पुस्तकांची मागणी होत जाऊन, आमच्या कवच्या सर्व प्रती संपल्या. या प्रतिसादामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले व आम्ही 'ट्रेस' चे संपूर्ण पुनर्लेखन करून काही नवीन भागही वाढवले आहेत. तळागाळांच्या संघर्षात असलेल्या आमच्या दोस्तांना जास्त उपयोगी होईल या आशेनेच 'ट्रेस' च्या सुधारित आवृत्तीचे काम केलेले आहे.

आपण आज जगत असलेल्या अन्याय्य आणि शोषक व्यवस्थेविषयी जाणीव जागृति होण्यासाठीच ट्रेस आहे. प्रेरक कार्यकर्ते ओळखले जाऊन त्यांचे प्रशिक्षण व्हावे त्यांच्यातील सर्वात चांगले गुण अधिक फुलावेत आणि सर्वांनाच अधिक न्याय्य समाज निर्मितीसाठी काम करण्याचे आवाहन व आव्हान मिळावे, असेही 'ट्रेस' पुस्तकाचे उद्देश आहेत. आणखी, विकासाविषयीची योग्य समज व उपयोगी माहिती सुद्धा प्रेरक कार्यकर्त्यांच्या हाती हे पुस्तक देते.

या पुस्तकात भाषणाची पद्धत्त (शाळा कॉलेजातील लेक्चरची पद्धत) वापरलेली नाही तर पोलो फेरा सांगतो ती पद्धत म्हणजे-व्यवहार, कृति-विचार-प्रतिबिंब अशी जाणीव जागृतीची पद्धत उपयोगात आणली आहे.

कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, सहानुभूतिदार, संघर्षातील मित्र व इतर मित्र अशा अनेक तर्‍हेच्या व्यक्तीनी निरनिराळया तन्हेने हे पुस्तक तयार होण्यास सहभाग दिला आहे. सर्वांची नावे देणे अशक्यच आहे. परंतु आम्ही त्यांचे कृतज्ञतापूर्वक आभारी आहोत.

मूळ इंग्लिश पुस्तक 'ट्रेस' याचा हा अनुवाद आहे. श्री. विजय कान्हेरे यांनी मोठ्या आस्थेने व श्रमपूर्वक हा अनुवाद केला आहे. वेळोवेळी चर्चा करून त्यांनी आम्हाला उत्स्फूर्त केल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

आम्ही अनेक व्यक्ती व पुस्तके यांकडून 'ट्रेस' साठी साहित्य घेतलेले आहे व आम्ही हे संपूर्ण नवीन पुस्तक आमचीच स्वयंभू निमिती आहे असा दावा करीत नाही. आपणा सर्वांना नवीन भारताकडे व नवीन जगाकडे जाण्याचे रस्ते शोधण्यास मागोवा घेण्यास ही सुधारित आवृत्ती आव्हान व प्रेरणा देईल अशी आशा आहे.


Marathi


Training Module
Activities'
Reference book for development workers
Participatory training - perspective and principle

371.3 / TRE(M)
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by KMLC

Powered by Koha