Salunkhe, A. H.

धर्म की धर्मापलीकडे?/ Dharma Ki dharmapalikade? - 3Zrd ed. - Satara Lokayat Prakashan 2022 - 124p.

१) धर्माचे स्वरूप, निर्मिती व उपयुक्तता
२) धर्मापलीकडे जाण्यामागची कारणे
३) धर्मापलीकडे जाण्यातील अडथळे आणि त्यांच्यावरचे उपाय
४) धर्म, विज्ञान व विवेक
५) हिंदू-मुसलमान : संघर्ष की सलोखा ?
६) समारोप

या संदर्भात असेही म्हणता येईल, की तमः स्वरूप धर्माच्या पलीकडे जाणे हा ज्योतिःस्वरूप धर्म आहे आणि ज्योतिः स्वरूप धर्म स्वीकारणे हे तमःस्वरूप धर्माच्या पलीकडे जाणे आहे. आणि हा काही केवळ शब्दांचा खेळ नाही. उलट 'धर्म' आणि 'धर्मापलीकडे' हे शब्द महत्त्वाचे नसून वक्त्याला या दोन शब्दांच्या माध्यमातून अभिप्रेत असलेला अर्थ महत्त्वाचा आहे, हे यामधून सूचित होते. शब्द काहीही असो; आम्हांला अभिप्रेत असलेल्या अर्थाच्या बाबतीत आमच्या मनात शंका वा द्विधा वृत्ती नाही. आम्हांला अज्ञान नको, आम्हांला द्वेष नको. आम्हांला प्रकाश हवा. आम्हांला माणूसकी हवी. आम्हांला हवे ओठा-ओठांवर प्रसन्न व मधुर स्मितहास्य, आम्हांला हवा हृदया-हृदयांमध्ये उत्कट आनंदाचा झरा. धर्म आमच्यासाठी हे सगळे करीत असेल, तर तो आमचा मित्र, आमचा सखा. तो आम्हांला हवा. मग आम्ही त्याच्या पलीकडे जाण्याची भाषा करणार नाही. तो आमच्यासाठी हे करणार नसेल, तर आम्हांला त्याची संगत नको. मग मात्र आम्ही त्याच्या पलीकडे जाण्याचा हर तन्हेने प्रयत्न करू. माझ्या दृष्टीने 'धर्म की धर्मापलीकडे' या प्रश्नाचे हे साधे-सरळ उत्तर आहे.


Marathi

978-8192728346


Religion
Hindu-Muslim
Hindu struggle

954.792 / SAL(M)
Urban Resource Centre (YUVA). All Rights Reserved. © 2021
Implemented and Customised by Mr. Wasim Rahaman for KMLC

Powered by Koha